Description
12 issue in 1 year
₹250.00 for 1 year
हरे कृष्ण
आता ‘जाऊ देवाचिया गावा’ मासिकाची डिजिटल आवृत्ती आम्ही प्रस्तुत करीत आहोत. यामुळे मासिकाचे नवीन अंक तुम्ही आपल्या संगणकावर ऑनलाईन वाचू शकता तसेच आपल्या मित्र-परिवारातील सदस्यांना भेट करू शकता. शिवाय, याठिकाणी आपले मत, प्रतिक्रिया देखीलप्रस्तुत करू शकता.
याबरोबरच, पूर्वीप्रमाणे मासिकाची छापलेली आवृत्ती देखील प्रकाशित होत राहील. आपणास हवे असल्यास त्याची देखील निवड करू शकता.
Pawan santosh mahajan –
Hare krishna
Ganesh Survase –
I have pay for btg magazine marathi
But I haven’t get any message.
Amalprem Das (verified owner) –
हरे कृष्ण, दण्डवत प्रणाम प्रभु,
‘जाऊ देवाचिया गावा’ या मासिकाची डिजीटल आवृत्ती प्रसिध्द होत असल्याचे वाचुन खुप खुप आनंद वाटला. बी.टी.जी.ने भगवद्भक्तांसाठी ही मोटीच पर्वणी/मेजवानी तयार केली आहे. सद्याचे युग हे डिजीटल युग आहे व मोबाईल स्मार्ट फोन, लॅपटॉप, संगणक अशा विविध माध्यमांद्वारे जग जवळ येत आहे. मोबाईल आता केवळ संपर्क साधण्याचे यंत्र राहीलेला नसुन ज्ञानार्जनाचे साधन देखील झाला आहे. मोबाईल आता शिक्षकाची भुमिका देखील पार पाडत आहे.
अशा परिस्थितीत, आपण भगवद्भक्तांनी ‘जाऊ देवाचिया गावा’ हे सुंदर मासिक आता डिजीटल स्वरुपात देण्याचा संकल्प केला आहे व तो यशस्वीरित्या पार देखील पाडत आहात. आपली कामगीरी खरोखरच अभिनंदनास पात्र अशीच आहे. भ.श्रीकृष्णांचे भक्त या निर्णयामुळे व सुविधेमुळे अतिशय आनंदीत झालेले आहेत. मी स्वतः या मासिकाचा पहील्या दिवशीच वर्गणीदार झालो आहे. मासिक फारच देखणे, सुंदर, रंगित व भक्तीरसाने ओथंबलेले आहे. या योजनेमुळे अनेक भक्त लाभान्वीत देखील झालेले आहेत. आपण हे डिजीटल प्रकाशन पुढे असेच सुरु ठेवावे, ही नम्र विनंती.
।। हरे कृष्ण ।।
आपला से.
अमलप्रेम दास,
जळगांव
Pradeep Baraskar (verified owner) –
हरे कृष्ण प्रभुजी, मागील वर्षी चे मासिक मला मेल द्वारे प्राप्त झाले नाही कृपया मला माझ्या वाटसप वर पीडीएफ पाठवा.
9923822913
वैशाली राजन चौगले . –
भगवान श्रीकृष्ण चरणी साष्टांग प्रणाम.मी भगवद्ददर्शन पत्रिका गेले 4 वर्षा पासून वाचत आहे .पण कोरोणामुळे 2 वर्षे तो अंक मिळत नव्हता . मंदिर बंद होते . माझ्याकडे जुने अंक होते ते मी परत सर्व वाचुन काढले आहेत. पण खुप आनंद होतो आहे मला . धन्यवाद हा अंक मोबाईल वर वाचता येईल . श्रीकृष्णाचीच कृपा आहे .,आपल्या सर्वांवर . हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे